
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली. सिमला महानगरपालिकेतही काँग्रेसने भाजपचा पराभव केला. त्यांच्या स्वतःच्या जिह्यात भाजपचा एकही उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत. कर्नाटकातही नड्डांच्या भाजपचा सुपडा साफ झाला. नड्डा म्हणजे पराभव हे चित्र स्पष्ट असताना काही गद्दारांच्या साथीने मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे दिवास्वप्न जे. पी. नड्डा पाहत आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज केली.
जे. पी. नड्डा यांनी बुधवारी आपल्या मुंबईतील दौऱयात महाविकास आघाडीवर टीका करताना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळून मुंबईत भाजपचा महापौर होईल, असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अतुल लोंढे यांनी समाचार घेतला. भाजपच्या राजकारणाला देशभरातील जनता पंटाळलेली आहे. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचारात भाजप आपंठ बुडालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जनता प्रतिसाद देत नाही तर जे. पी. नड्डांना कोण प्रतिसाद देणार? परंतु राणा भीमदेवी थाटात मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या वल्गना ते करत आहेत, अशी खिल्ली लोंढे यांनी उडविली.






























































