ब्राझीलला मोठा धक्का, फीफा वर्ल्डकपमधून डिफेंडर वेस्ली बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड कपच्या तोंडावर ब्राझीलला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे डिफेंडर वेस्ली स्पर्धेबाहेर फेकला गेला असून प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी मध्य फळीतील खेळाडू एडरसनला संघात स्थान दिले आहे. रोमा क्लबच्या वेस्लीच्या मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे बचावफळीची ताकद कमी झाली असली तरी, एडरसनच्या समावेशाने संघाला नवी धार मिळाली आहे. आता मोरोक्कोविरुद्धच्या पहिल्या लढतीकडे ब्राझीलचे लक्ष लागले आहे.