ब्रेकिंग – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Devendra fadanvis chief minister maharashtra

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या