देवेंद्र फडणवीस भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस यांना बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल व भाजपच्या आघाडीचे सरकार आहे. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेल्या रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीत नितीश कुमार यांच्याबाबत असलेली नाराजी तसेच कृषी विधेयकावरून देशभरातील शेतकऱयांत भाजपविरोधात व्यक्त होणारा संताप लक्षात घेता बिहार निवडणुकीत भाजपची खऱया अर्थाने कसोटी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.