विधानसभेत युती केली ही चूक अन्यथा 150 जागांच्या पुढे गेलो असतो

cm-devendra-fadnavis

विधानसभा निवडणुकीत युती केली ही एकच चूक आपण केली. अन्यथा भाजपला स्वबळावर 150 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या असा दावा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने आयोजित केलेल्या सेवासप्ताह कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली तर 150 पेक्षा अधिक जागा मिळतील आणि युती केली तर 200 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज तेव्हा व्यक्त करण्यात आला होता. पण त्यावेळी आपण एकच चूक केली ती म्हणजे युती केली असे ते म्हणाले.

मनमोहन सिंग यांच्यावर टीका
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही टीका केली. मनमोहन सिंग सज्जन व्यक्ती आहेत. पण त्यांचे सरकारवर काहीही नियंत्रण नक्हते. त्यावेळी प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता. मात्र पंतप्रधान स्वत:ला पंतप्रधान समजत नव्हते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातच देश रसातळाला गेला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली. स्वामी विवेकनंदांप्रमाणे योद्धा संन्यासी होऊन मोदी जीवन जगत आहेत असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या