12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी फक्त 3 अर्ज वैध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्गातील 24 ग्रामपंचायतींमध्‍ये मालवण तालुका, देवगड तालुका, कणकवली तालुका, दोडामार्ग तालुका, वेंगुर्ले तालुका, कुडाळ तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक व पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू आहे. देवगड तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकामध्‍ये वळीवंडे, शिरवली, रामेश्‍वर, पावणाई, फणसगांव, विठलादेवी, वानिवडे, तिर्लोट, ठाकूरवाडी आदी 9 ग्रामपंचयातींचा समावेश आहे.

या 9 ग्रा.पं.च्‍या सार्वत्रिक निवडणुकां करिता सरपंच पदाच्या 9 जागांकरिता 24 अर्ज वैध ठरले तर पावणाई सरपंच पदाचा 1 अर्ज अवैध ठरला. तर 69 सदस्य पदाकरिता 131 उमेदवारी अर्ज वैध ठरले, शिरवली ग्रा प सदस्य 2 अर्ज अवैथ ठरले. आहेत.सोबत 12 ग्रा.पं.च्‍या पोटनिवडणुका होणार असून याग्रामपंचातीमध्‍ये कुवळे, सांडवे, आरे, विजयदुर्ग, इळये, मळेगांव, हडपिड, ओंबळ, गवाणे, गोवळ, पेंढरी, मणचे आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या पोट निवडणुकांकरिता फक्त 3 नामनिर्देशन पत्र वैध ठरली.

यात वळीवंडे सरपंच पदाकरिता 4 सरपंच, 7 सदस्य, शिरवली सरपंच 2, सदस्य 14, रामेश्वर सरपंच 3, सदस्य -22, पावणाई सरपंच 4, सदस्य -11, फणसगाव सरपंच 4, सदस्य-18, विठलादेवी सरपंच 2, सदस्य 14, वानिवडे सरपंच 2, सदस्य 10, तिर्लोट सरपंच 6, सदस्य 28, ठाकूरवाडी सरपंच 1, सदस्य 7 या प्रमाणे नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत. निर्धारित निवडणूक कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत दाखल करता आली नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 रोजी पार पडली. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत मागे घेता येईल. त्‍याच दिवशी निवडणूक चिन्‍हांचे वाटप करण्‍यात येईल. 5 नोव्‍हेंबर रोजी स.7.30 ते 5.30 वाजता या वेळेत मतदान, तर मतमोजणी 6 नोव्‍हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक होणा-या ग्रामपंचात क्षेत्रात आचार संहिंता लागू झाली असून देवगड तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.