धनगर आरक्षण : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल-जागर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

धनगर समाजाचे एस.टी.च्या आरक्षण अंमलबजावणी तात्काळ करावे आणि अन्य प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ढोल-जागर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा धनगरसमाज आरक्षण अंमलबजावनी समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला घटनेमध्ये एस.टी.चे आरक्षण दिलेले आहे. परंतु त्याची अंमलबजावनी मात्र अद्यापर्यंत करण्यात आलेली नाही. गेल्या 70 वर्षापासून शासनाने केवळ आश्वासने दिली आहेत. त्याचबरोबर 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तेर आलेल्या शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासित केले होते. तसेच सत्तेर आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट मध्ये आरक्षणाची अंमलबजावनी करु असे आश्वासन दिले परंतु चार वर्ष उलटली तरीही धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, ही बाब अधोरेखीत करण्यात आली आहे. तसेच या निवेदनात महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस.टी.चे आरक्षण अंमलबजावनी तात्काळ करावी, या मागणीसह अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाला 2 हजार कोटी रुपयांचे अनुदान तात्काळ द्यावे, राज्यातील मेंढ पाळासाठी प्रत्येक जिल्ह्यात गायरान जमीन राखीव करुन चारा उपलब्धक करुन द्यावा, धनगर समाजातील मेंढ्यांना पावसाळ्यात वनक्षेत्रात चराईसाठी मान्यता द्यावी, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे, जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, राज्यातील प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी धनगर समाजाच्या विद्याथ्र्यांसाठी 500 मुलामुंलींसाठी वसतीगृहाची स्थापना करावी, तांडा वस्तीसाठी वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावा, सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील 19 वर्षिय योगेश कारके या युवकाने धनगरसमाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बलिदान दिले आहे. या तरुणाच्या नातेवाईकास 50 लाख रुपये व शासकीय नौकरीत सामावून घ्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मंजूर न झाल्यास संपूर्ण धनगर समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.