अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबासह चौघे दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
girl-rape

सामना प्रतिनिधी । ठाणे

पालकांना पैशाचा पाऊस पाडण्याचे अामिष दाखवून त्यांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबासह चौघांना कल्याण सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. चारही दोषींना 17 नोव्हेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. 7 मे 2015 रोजी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने डोंबिवली पूर्वेकडील गांधी नगर परिसरात छापा टाकून या भोंदूबाबाला रंगेहात पकडले होते.

डोंबिवली पूर्वेच्या गांधी नगर परिसरात पालकांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून त्यांच्या अल्पवयीन मुलीवर विजय ठोंबरे हा भोंदूबाबा लैंगिक अत्याचार करत होता. चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने केलेल्या कारवाईत भोंदूबाबासह पीडित मुलीचे वडील, आजी आणि भोंदुबाबाची एजंट अशा चौघांवर गुन्हे दाखल करून कल्याण सत्र न्यायालयात खटला सुरू होता. शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने चार आरोपींना दोषी ठरवले आहे. तर पीडित मुलीच्या सावत्र आईची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी येत्या 17 नोव्हेंबर रोजी कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन एम वाघमारे दोषींना शिक्षा सुनावणार आहेत.