वाडीभोकर रस्त्यावरील जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

589

देवपुरातील वलवाडी शिवारातील वाडीभोकर रस्त्यावर भूमिगत गटारीचे काम करताना जलवाहिनी फुटली. परिणामी हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. भूमिगत गटारीसाठी खोदकाम करताना पाणी पुरवठा विभाग आणि बांधकाम विभागात समन्वय का राखला जात नाही, असा प्रश्न नागरिकांचा आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीला नागरिक सामोरे जात असताना पाणी वाया जात आहे.

धुळे शहरात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने भूमिगत गटारीचे काम सुरू आहे, परंतु हे काम करतांना बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठा विभाग समन्वय राखत नाही. बऱयाच ठिकाणी गटारीसाठी खोदकाम करताना जलवाहिन्या फुटल्या आहेत. तसेच नागरिकांच्या नळ जोडण्यादेखील तुटल्या आहेत. वलवाडी शिवारातील वाडीभोकर रोडलगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाण्याची येथे नासाडी होत आहे. पाण्यामुळे सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे. कॉलनी परिसरात राहणाऱया नागरिकांना रस्त्याचा वापर करणे कठीण झाले आहे. महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. पाण्याच्या नासाडीला जबाबदार धरून संबंधितांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. याशिवाय त्यांना पाण्याचे मोल आणि नागरिकांच्या गैरसोयीची जाणीव होणार नाही, अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या