देशाच्या विकासात कामगारांचा मोठा वाटा  – दिलीप वळसे-पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामगारांच्या हातामध्ये नवनिर्माण करण्याची मोठी शक्ती आहे. त्यामुळेच आपले राज्य आणि देश खंबीरपणे उभा राहिला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढले आहेत. कामगारांच्या मेहनतीमुळेच आपण प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 33 व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळ्यात दिलीप वळसे-पाटील बोलत होते.  यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विकास आयुक्त पंकज पुमार, कल्याण आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते.