शिवरायांचा छावा अवतरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरले गेलेले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे अवघे आयुष्य एक धगधगतं अग्निपुंड म्हणावं लागेल. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर मोठय़ा पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट घेऊन येत आहेत. तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. त्याआधी ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ चित्रपट 16 फेब्रुवारी प्रदर्शित होईल. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणीदेखील त्यांचीच आहेत. युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी गीतांना संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.