फटाकेबंदी फायद्याची! दिवाळीतील आगीच्या घटना 94 टक्क्यांनी घटल्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत यावर्षी पालिकेने दिवाळीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर घातलेली बंदी चांगलीच फायद्याची ठरली असून फायर कॉलची संख्या 200 वरून थेट 15 पर्यंत खाली आली आहे. हे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत तब्बल 94 टक्क्यांनी कमी झाले आहे. विशेष आलेल्या 15 फायर कॉलच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जीवितहानीही झाली नसल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली.

कोरोना आजार श्वसनाशी सर्वाधिक संबंधित असल्यामुळे पालिकेकडून दिवाळीत मोठे फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली होती. यादृष्टीने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार मुंबईभरात पालिकेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली. फटाके पह्डल्यास पालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. याला बहुतांशी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत मोठे फटाके वाजवणे टाळले. दुकानदारांनीही मोठय़ा फटाक्यांची विक्री केली नाही. परिणामी दरवर्षी दिवाळी दिवशी येणाऱया 150 ते 200 फायर का@लची संख्या 15 पर्यंत खाली आल्याचे प्रमुख अनिशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी सांगितले.

एका कॉलवर 5 ते 15 अधिकारी
– कोणत्याही फायर का@लमध्ये आगीवर तातडीने नियंत्रण मिळवता यावे यासाठी अग्निशमन दलाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येक का@लमध्ये 5 ते 15 पर्यंत प्रमुख अग्निशमन अधिकारी तैनात ठेवण्यात येत आहेत.
z शिवाय अग्निशमन दल प्रमुख स्वतः फिल्डवर आणि वायरलेसद्वारे अधिकारी जवानांच्या संपका&त राहत असल्यामुळे जवानांना बचावकार्य करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. परिणामी जीवित-वित्तहानी टळण्यासही मदत होत आहे.
z यावर्षीच्या दिवाळी दिवशीही अग्निशमन दलाचे तब्बल अडीच हजार कर्मचारी सुट्टी न घेता अहोरात्र कर्तव्यावर हजर होते. विशेष म्हणजे मुंबईकरांनीही पालिकेने घालून दिलेले नियम पाळून प्रशासनाला मोठे सहकार्य केल्याचेही शशिकांत काळे यांनी सांगितले.