
धनत्रयोदिवशी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी दागदागिने, रत्ने, धातू, घरगुती उत्पादने खरेदी करणे शुभ मानले जाते. याचबरोबर धनत्रयोदिवशी नवीन झाडू घेऊन त्याची पूजा केली जाते.
कार्तिक मासातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी सण साजरा केला जातो. धनत्रयोदिवशी देवी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरीच्या पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी आणि गोमची चक्र सारख्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही एक छोटे किंवा मोठे भांडे विकत घ्यावा.
झाडू खरेदी करताना..
धनत्रयोदिवशी नवीन झाडूची खरेदी करणे आर्थिक संपन्नता वाढते. मात्र या दिवशी कोणतीही झाडू खरेदी करु नये. या दिवशी फुलवाल्या झाडू किंवा हिराची झाडू खरेदी केली जाते. नवीन झाडू स्वयपाकघरात, बेडरुम, पलंगाखाली किंवा कपाटाच्या आजूबाजूला ठेवू नये.
भरीव झाडू खरेदी करणे
झाडू खरेदी करताना ती भरीव आणि झुपकेदार असल्याची खात्री करुन घ्यावी. झाडूचे हिर मजबूत आहेत की नाही ते पाहून घ्यावे. मध्येच ती तुटता कामा नये.
प्लास्टीकची झाडू खरेदी करताना
धनत्रयोदिवशी शक्यतो प्लास्टीकची झाडू खरेदी करु नका. यादिवशी प्लास्टीकचे सामान खरेदी करु नका. प्लास्टीक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. तसेच प्लास्टीक एक अशुद्ध धातू आहे. त्यामुळे प्लास्टीकची खरेदी करणे शक्यतो टाळा.
झाडू आणल्य़ानंतर
नवीन झाडू आणल्यानंतर ती लगेच वापरायला न घेता आधी झाडूची पूजा करावी. त्यानंतर झाडूला कुंकू लावावे आणि त्यावर अक्षता टाकाव्यात. त्यानंतर झाडूचा वापर करावा.
धनत्रयोदिवशी पूजा कशी करावी
सायंकाळी उत्तरेकडे कुबेर आणि धन्वंतरी देवीची स्थापना करावी. त्यानंतर समोर तूप आणि एकमुखी दिवा लावावा. कुबेर देवाला पांढऱ्या रंगाची मिठाई आणि धन्वंतरी देवीला पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ॐ ह्रीं कुबेराय नमः” हा जप करावा आणि नंतर धन्वंतरी स्त्रोत्राचे पठण करावे आणि प्रसाद खावा. दिवाळीच्या दिवशी कुबेराला धनाच्या स्थानावर ठेवावे आणि धन्वंतरी देवीला पूजेच्या ठिकाणी स्थापन करावे.





























































