लिंबाची साल फेकून देऊ नका, ‘हे’ आश्चर्यकारक फायदे वाचून थक्क व्हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
लिंबाचा रस - कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लिंबाचा रस लावून दहा मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुऊन घ्या. हा उपाय दिवसातून दोनवेळा करू शकता. सकाळी आणि रात्री करू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबाचा वापर आवर्जून केला जातोच. लिंबू पाणी, लिंबाचे सरबत, लेमन टी, लोणचे इत्यादी पदार्थांसाठी लिंबू वापरले जाते. उन्हाळ्यात लिंबाचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहायला मदत होते. बऱ्याचदा असे होते की, लोकं लिंबाचा वापर केल्यानंतर लिंबाची साल फेकून देतात, मात्र हे तुम्हाला माहित आहे का की, लिंबाची साल विविध उपायांकरिता गुणकारी ठरते.

लिंबाच्या सालीत भरपूर कॅलरी असतात. यामध्ये फायबर, जीवनसत्त्व सी आणि डी, लीमोनेन भरपूर प्रमाणात असते. लिंबाची सालीमुळे शरीराला अनेक प्रकारची पोषक तत्त्वे मिळतात. सालीच्या वापरामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. लिंबाची साल वाळवून त्याची पावडर तयार करावी. एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंबाची पावडर मिसळून दररोज प्यायल्यामुळे लठ्ठपणा कमी व्हायला मदत होते.

लिंबाच्या सालीत अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन दूर व्हायला मदत होते. लिंबाच्या सालीची पावडर दातांना लावल्याने कॅविटी आणि दाढीचे दुखणे होऊ शकते शिवाय यामुळे दातही चमकदार होतात.

– लिंबाच्या सालीचे लोणचे बनवून त्याचाही रोजच्या आहारात समावेश करू शकता. हे लोणचे अतिशय रुचकर, स्वादिष्ट असते.

– ग्रीन टीमध्ये लिंबाच्या सालीचा उपयोग केला जाऊ शकतो. ग्रीन टी बनवत असाल तेव्हा त्यामध्ये लिंबाचा स्वाद येण्याकरिता लिंबाची साल घाला.

– लिंबाच्या सालीचा उपयोग हातचा मळ काढण्यासाठी करता येतो. जेवणानंतर हाताला आलेला तेलकटपणा किंवा वास जाण्यासाठी लिंबाच्या सालीचा उपयोग करता येऊ शकतो.