
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये संशोधक विद्यार्थ्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची घटना आज सोमवारी घडली. याच विद्यार्थ्याने मुलीस मिठी मारली. त्यात सदर मुलगी ही जखमी झाली आहे. दोन्ही जखमी विद्यार्थ्यांना पोलीस घाटी रुग्णालयात घेऊन गेले आहेत. जखमी झालेले दोन्ही विद्यार्थी संशोधक विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.






























































