डॉ. राणी बंग यांची प्रकृती खालावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ‘महाराष्ट्र भूषण’ डॉ. राणी बंग यांना मेंदूतील अस्वास्थ्यामुळे येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (सिम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी वर्धा येथील एका कार्यक्रमात डॉ. राणी बंग सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार करण्यात येत असल्याची माहिती त्यांचे पुत्र डॉ. आनंद बंग यांनी दिली आहे.

एमजीआयएमएस सेवाग्राम येथे डॉ. जाजू आणि डॉ. कलंत्री यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्यावर डॉ. काबरा (न्यूरोलॉजिस्ट), डॉ. अंकिता राजपूत (इंटेन्सिव्हिस्ट) यांच्या नेतृत्वाखालील टीमद्वारे सीआयआयएमएस, नागपूरच्या आयसीयूमध्ये उपचार केले जात आहे.