बीकेसीत शुक्रवारपासून ड्राइव्ह–इन–थिएटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खुल्या आकाशाखाली स्वतःच्या कारमध्ये बसून मोठय़ा पडद्यावर  सिनेमा बघण्याचा आनंद आता मुंबईकरांना घेता येणार आहे. रिलायन्सच्या वतीने देशातील पहिले रुपटॉप ड्राइव्ह-इन-थिएटर वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे शुक्रवार, 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

बीकेसीमधील ड्राइव्ह-इन-थिएटर पीव्हीआरच्या वतीने चालवले जाणार आहे. एकाच वेळी येथे 290 कार पार्किंग करता येतील. प्रेक्षकांना अतुलनीय सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. विशेषतः कोरोनाच्या महामारीनंतर बाहेर जाऊन चित्रपट पाहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे रिलायन्सने म्हटले आहे. देशात ड्राइव्ह-इन-थिएटरची संकल्पना वेगाने विकसित होत आहे. सध्या देशामध्ये सहा ड्राइव्ह-इन-थिएटर्स आहेत.