बुडालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह चाळीस तासांनंतर सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी (ता. 16) सायंकाळी प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या यश कृष्णा आडेप (वय 15) या विद्यार्थ्याचा मृतदेह चाळीस तासांनंतर गुरुवारी सकाळी खराडीनजीक तरंगताना आढळला. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह मित्रमंडळींना शोक अनावर झाला होता.

मंगळवारी (ता. 16) सायंकाळी पद्मनगरमध्ये राहणारा आणि सह्याद्री विद्यालयात नववीत शिक्षण घेणारा यश आडेप हा मित्रांसोबत संगमनेर खुर्दनजीकच्या पुलाजवळ आंघोळीसाठी गेला होता. यावेळी त्यातील दोघे गटांगळ्या खाऊ लागल्याने यश त्यांना वाचवण्यासाठी गेला. मात्र, यावेळी तोच बुडाला. तेव्हापासून प्रशासन, त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी त्याचा दिवस-रात्र शोध घेत होते. या घटनेला 40 तास लोटल्यानंतर आज सकाळी खराडीनजीक यशचा मृतदेह आढळला