
बांधकाम व्यावसायिक डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळून लावला. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर कुलकर्णी दांपत्य आणि सई कांजपे यांनी जामीन मिळावा म्हणून तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, अश्विनी देशपांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यातील कुलकर्णी दांपत्याला न्यायालयाने जामीन नाकारला तर सई कांजपे आणि इतरांच्या अर्जावर मात्र अद्याप निकाल झालेला नाही. डीएसके यांचा मुलगा शिरीष देशपांडे यांनीदेखील जामिनासाठी अर्ज केला आहे, मात्र त्यांच्या अर्जावर युक्तिवाद न केल्याने त्याकर तूर्तास निर्णय होणार नाही. डीएसके यांनी 184 कोटी रुपये आपल्या नातेवाईकांच्या खात्यावर वळवले. प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज घेऊन ते इतरत्र कळवले. डीएसके यांनी आर्थिक नियोजन न केल्यामुळे त्यांच्यावर कर्ज झाल्याचा युक्तिवाद किशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला होता.



























































