
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्र्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतला असला तरी आजही मैदानावरील त्याचा जलवा कायम आहे. युएईत सुरू असलेल्या टी-10 ली स्पर्धेत ब्राव्होने केलेला एक अनोखा डान्स लोकांना मनोरंजीत करत आहे. मराठा अरेबियन्स संघाकडून खेळताना ब्रोव्होने विकेट घेतल्यानंतर केलेला ‘चिकन डान्स’ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
बंगाल टायगर्सविरुद्धच्या सामन्यात ड्वेन ब्राव्होने 9 व्या षटकात मोहम्मद नबीचा झेल घेतला. यानंतर ब्राव्होने चिकन डान्स केला. हा डान्स पाहून मैदानावरील खेळाडू आणि प्रेक्षकही आपले हसू आवरू शकले नाहीत. सोशल मीडियावर या व्हिडीओने सध्या धुमाकूळ घातला आहे.
Watch Dwayne Bravo’s Dance Unbelievable! | T10 League https://t.co/zeuHENvCLW
— Tarun Singh Verma (@TarunSinghVerm1) December 3, 2018
ब्राव्होने वेस्ट इंडिजकडून 40 कसोटी, 164 एक दिवसीय आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 2200 धावा व 86 विकेट, एक दिवसीय क्रिकेटमध्ये 2968 धावा व 199 विकेट आणि टी-20 मध्ये 1142 धावा व 52 विकेट आहेत.





















































