
कुत्रा हा माणसाचा बेस्ट फ्रेंड असतो असे म्हणतात. इन्स्टाग्रामवरही आपल्या पाळीव कुत्र्यांचे अनेकांनी प्रोफाईल बनवले आहे. या प्रोफाईलवरून मालक आपल्या लाडक्या कुत्र्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतत असतात. यातच आता अमेरिकेच्या एका कुत्र्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या कुत्र्याच्या डोक्यावर कान आला आहे. त्याला गोल्डन युनिकॉर्न असे नाव पडले आहे.
इंग्लंडच्या मिरर या वृत्तपत्राने बातमी दिली आहे. युनिकॉर्न म्हणजे एक मिथ्या प्राणी आहे. जो घोड्यासारखा असतो आणि त्याच्या कपाळावर शिंग असतं. तसेच हा युनिकॉर्न उडतो ही. त्यावरूनच या कुत्र्याला गोल्डन युनिकॉर्न असे म्हटले आहे. हा कुत्रा गोल्डन रीट्रीव जातीचा आहे. एका अपघातात त्याने एक कान गमावला होता. नंतर काही दिवसानंतर त्याच्या डोक्यावर कान उगवला आहे. या कुत्र्याच्या मालकीणीने त्याचे नाव रे (rae) असे ठेवले आहे. Rae चा उलटा उच्चार Ear म्हणजेच कान असा होतो. म्हणून या कुत्र्याचे नाव रे असे ठेवले आहे. एका युसरने कुत्र्याचा व्हिडीओ टिकटोकवर अपलोड केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला होता.































































