
सामना प्रतिनिधी । वाणगाव
भूकंपाने शनिवारी डहाणू व तलासरी पुन्हा हादरून गेली. 3.3 रिश्टर स्केलचे लागोपाठ तीन धक्के बसल्याने घरांना भेगा पडल्या. भांडीदेखील जमिनीवर कोसळली. महिनाभरातील या दुसऱ्या घटनेमुळे हजारो रहिवासी भयभीत झाले असून आज दुपारच्या भूकंपामुळे अनेकजण घरातून पळून रस्त्यावर आले. कधी गूढ आवाज तर कधी भूकंपाचे धक्के यामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर लगेच तीन मिनिटांनी दुसरा भूकंप झाला. दुपारी 3.30 वाजता पुन्हा तिसरा धक्का बसताच नागरिक भयभीत झाले. घरातील भांडी कोसळली. डहाणू तालुक्यातील धुंदलकाडी, हळदपाडा, दापचरी, सांसकंद, करखंडा, कंकास, मोडगाक, तर तलासरी तालुक्यातील तलासरी, कडकली, ककाडा, कसा, कारजगाक, कुर्झे, सूत्रकार, अनकीर, सकरोली, कोचाई, बोरमाळ, उपलाट, आमगाक, आच्छाड, संभा, गिरगाक गिभणीया इत्यादी गाकांना पुन्हा भूकंपाचे जोरदार हादरे बसले.
गुजरातमध्येही हादरे
दुपारी झालेल्या भूकंपाने गुजरात राज्यातील उंबरगाक, संजाण, भिलाड, कापी इत्यादी ठिकाणीही हादरे जाणवले. तिथेही अनेक घरांना तडे गेले असून दिवसभर भीतीचे वातावरण होते.
घरे कोसळण्याची भीती
डहाणू व तलासरी तालुक्यात 11 नोव्हेंबरला भूकंपाचे धक्के बसले होते. तसेच गूढ आवाजानेदेखील येथील परिसर हादरून गेला. या भूकंपाने घरांना पडलेले तडे अजून बुजवले नसतानाच आज पुन्हा लागोपाठ तीन भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. वारंवार हादरे बसत असताना अनेकांची घरे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. आजची रात्र भीतीमुळे ग्रामस्थांनी घराबाहेरच जागून काढली.
































































