पालघरमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के, सुदैवाने जीवितहानी नाही

628
earthquake-measurement

पालघर जिल्ह्यात आज पहाटे भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. हवामान विभागाने ही माहिती दिली असून सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पालघर जिल्ह्यात आज पहाटे 5.22 वाजता 4.8 रिश्टर तीव्र भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. या बाबत कुठलेही जीवितहानी झालेली नाही.

यापूर्वी उत्तराखंडाच्या चमोली आणि रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी सायंकाही भुकंपाचे धक्के जाणवले होते. चमोली रुद्रप्रयागमध्ये चार ते पाच वाजण्याच्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार भुकंपाचे केंद्र चमोलीजवळ होते. चमोलीत आलेला भुकंप हा 4.4 तर रुद्रप्रयागमधील भुकंप हा 2.5 रिश्टर तीव्रतेचा होता. भुकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून बाहेर पडले.

 

आपली प्रतिक्रिया द्या