नाशिक जिह्यात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळी चार भूपंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यासह दिंडोरी, कळवण व पेठ तालुक्यात रात्री तसेच रविवारी पहाटेही भूकंप झाल्याची नोंद मेरी येथील भूकंपमापन केंद्रात झाली. यात सर्वाधिक 3.6 रिश्टर स्केलची नोंद असली तरी कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीपृष्ण देशपांडे यांनी दिली.