श्रीलंकेतील इस्टर हल्लेखोर हिंदुस्थानात गेले नाही, श्रीलंकेच्या राष्ट्रपतींची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेतील इस्टर हल्लेखोर हिंदुस्थानात गेले नाही अशी माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी हिंदुस्थानात गेले नाही तसेच आपल्या अधिकार्‍यांनी याबाबत कुठलीच माहिती दिली नसल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

एका पत्रकार परीषदेत बोलताना सिरीसेना म्हणाले की, “मला मिळालेल्या अहवालानुसार श्रीलंकेतील हल्लेखोर हिंदुस्थानात गेले. परंतु माझ्या अधिकार्‍यांनी याबाबत कुठलीच माहिती दिली नाही.” हिंदुस्थाननी गुप्तचर संस्थांनी श्रीलंकेला दहशतवादी हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती. याबाबत संरक्षणमंत्रालयाने आपल्याला काहीच सांगितले नाही असेही सिरीसेना यांनी सांगितले.

सिरीसेना म्हणाले की, “4 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान मी श्रीलंकेतच होतो. परंतु या हल्ल्याची पूर्वसुचना हिंदुस्थानकडून मिळाल्याचे मला कुणीच सांगितले नाही. जर मला ही बाब माहित असती तर मी देशाबहेर गेलोच नसतो. म्हणूनची मी संरक्षण मंत्रालयाचे सचिव आणि पोलीस महानिरीक्षकांना पदावरून हटवण्याची कारवाई केली.”

तसेच या हल्ल्याचा तपासासाठी हिंदुस्थान, इंग्लंड आणि अमेरिकेने पूर्ण सहकार्य केल्याचे त्यांनी म्हटले.  हा हल्ला आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून झला आहे, श्रीलंकेच्या दहशतवाद्यांनी त्यांच्याकडूनच प्रशिक्षण घेतले. तसेच काही दहशतवादी हे श्रीमंत घराचे असून या हल्ल्यासाठी देशाबाहेरील पैसे वापरल्याचे कुठलेच पुरावे मिळाले नसल्याचे सिरीसेना यांनी म्हटले.