हे करून पहा – पावसाळ्यात घर राहील निरोगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढल्याने भिंतींना ओलावा आणि घरात कुबट वास येऊ शकतो. घराचे रक्षण करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर डोअरमॅट ठेवा, खिडक्या-दरवाजे उघडे ठेवा, बुरशीपासून वाचण्यासाठी अँटी-फंगस उपायांचा वापर करा.

छतावर आणि बाहेरील भिंतींवर पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. खिडक्यांच्या कडांना किंवा फटींमधून पाणी येत असल्यास त्या लगेच सिलिकॉन किंवा वॉटरप्रूफिंग पेस्टने बंद करा. कपाटांमधील ओलावा टाळण्यासाठी सिलिका जेल किंवा कापूर वापरा.