टेट्रा पॅकपासून पर्यावरणपूरक बेंच, मानखुर्द शाळेच्या विद्यार्थ्यांना वसुंधरा दिनाची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका पर्यावरणपूरक अभियानांतर्गत टेट्रापॅक कार्टन्सपासून विद्यार्थ्यांसाठी बाकं (डेस्क) बनवण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मानखुर्द येथील लेण्याद्री शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांना रिसायकल केलेल्या बीव्हरेज कार्टनपासून बनवलेली  40 बापं नुकतीच भेट मिळाली आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेली वसुंधरा दिनाची ही खास भेट आहे.

पर्यावरणासंबंधी लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी नेस्ले प्लस, रिलायन्स रिटेल यांच्या सहकार्याने टेट्रापॅकने ‘कार्टन्स2क्लासरूम’ मोहीम सुरू केली आहे.  आरयूआर ग्रीनलाइफने  ही मोहीम कार्यान्वित केली आहे. यामध्ये लोकांकडून वापरलेली कार्टन्स मागवण्यात आली होती. मोहिमेत सहभागी संस्थांनी  10 लाख  कार्टन्स गोळा करण्याचे आणि  त्यावर रिसायकल प्रक्रिया करून विविध शाळांना 100 डेस्क दान करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.  त्यानुसार गेल्या वर्षभरात माहीम पोलीस कॉलनी शाळा आणि पुणे विद्यार्थीगृह, नेरूळ यांना एकूण 60 बाकं देण्यात आली होती. आता तिसऱया टप्प्यात मानखुर्दच्या शाळेला पर्यावरणपूरक बापं देण्यात आली आहेत. अशा तऱहेने शाळांना 100 बाकं देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे.

‘कार्टन्स2क्लासरूम’ ही मोहीम रिलायन्स रिटेल आणि आरयूआर  ग्रीनलाइफ यांच्या सहकार्याने टेट्रापॅकने 2010 मध्ये सुरू केलेल्या ‘गो ग्रीन विथ टेट्रापॅक’ या कार्यक्रमाचा एक भाग आहे. याअंतर्गत  मुंबईतील 57 रिलायन्स स्मार्ट आणि सहकारी भंडार आऊटलेट्सवर मुंबईकरांना  वापरलेली बीव्हरेज कार्टन्स देऊन टाकण्याचे आवाहने केले जाते. या कार्टनवर रिसायकलिंग करून  डेस्क आणि गार्डन बेंचसारख्या उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात.