
बँकिंग संकटामुळे अर्थव्यवस्थेची गती धीमी झाली असताना कर्जबुडव्यांमुळे ती अनेक पटींनी वाढणार आहे. त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी व्यक्त केली आहे.
वॉरेन बफे त्यांची पंपनी बर्कशायर हॅथवेच्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील ओमाहा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी सध्याच्या अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आपले मत मांडले. ते म्हणाले, सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँकेचे प्रकरण राजकारणी, नियामक आणि मीडियाने चुकीच्या पद्धतीने हाताळले ते पूर्णपणे चुकीचे होते. बँकांमध्ये ठेवी सुरक्षित नाहीत अशी भीती ठेवीदारांना वाटत आहे. ही भीती अनाठायी आहे, मात्र ही भीती घालवण्यात राजकारणी, नियामक आणि मीडियालाही अजून यश आलेले नाही, अशी खंत बफे यांनी
व्यक्त केली.


























































