
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक खेचून घेतात, समृद्धी मार्गावर ड्रायव्हिंग सीटवर बसून शिंदेंना फिरवून आणतात, महत्त्वाची घोषणाही तेच करतात… त्यामुळे खरे मुख्यमंत्री कोण हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला असतानाच दस्तुरखुद्द शिंदे यांनाही वाटते की, फडणवीस मुख्यमंत्री आहेत.
आज गोरेगाव येथे स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी शिंदे, फडणवीस दोघेही उपस्थित होते. शिंदे यांनी भाषणाची सुरुवात करतानाच फडणवीस यांचा उल्लेख चक्क ‘महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री’ असा केल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.




























































