हत्तीच्या कळपाने काढली पिल्लाची अंत्ययात्रा, काळीज चिरणारा व्हिडीओ व्हायरल

730

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माणूस हा कितीही डोकेबाज किंवा हळवा असला तरी अनेकदा प्राणी त्याला खूप काही शिकवून जातात. सध्या असाच एक हत्तीच्या कळपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत हत्तीच्या पिल्लासाठी संपूर्ण कळप अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला होता. काळजाचे पाणी करणारा हा व्हिडीओ फॉरेस्ट अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

फॉरेस्ट अधिकारी परवीन कासवान यांनी 9 जून रोजी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये मोठा हत्ती मृत पिल्लाला सोंडीमध्ये उचलून जंगलात घेऊन जाताना दिसत आहे. त्याच्यापाठोपाठ कळपातील इतर पाच ते सहा हत्तीही या अंत्ययात्रेत सहभागी होतात. यानंतर सर्व कळप मृत हत्तीच्या पिल्लाला जंगलामध्ये घेऊन जातात. ‘मृत पिल्लाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना हत्तीचा कळप. अजूनही संपूर्ण कुटुंब पिल्लाला सोडू इच्छित नाही’, असे कॅप्शन कासवान यांनी व्हिडीओला दिले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यातापर्यंत 7 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला असून 14 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअऱ करताना भावून मेसेज लिहिले आहेत. याच संदर्भात आणखी एक ट्वीट करताना कासवान यांनी लिहिले आहे की, ‘जंगलातील हत्तींच्या अंत्यसंस्काराबात प्राचिन अख्यायिका आहेत. अनेकांनी याबाबत लिहिले आहे. परंतु याचा पुरावा अद्याप सापडलेला नाही. अनेक वेळा हत्ती पाणलोट क्षेत्रामध्ये मृत आढळून येतात.’

आपली प्रतिक्रिया द्या