नाशकातील सात धरणे कोरडीठाक, फक्त 11 टक्के पाणीसाठा शिल्लक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक जिह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 7 हजार 445 दशलक्ष घनफूट म्हणजेच अवघा 11 टक्के शिल्लक राहिल्याने गंभीर पाणीप्रश्न उभा ठाकला आहे. 24 पैकी तब्बल 7 धरणे कोरडीठाक पडली असून, 8 धरणांनी तळ गाठला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा उरला आहे.

धनोली धरणाचे गेट बेकायदेशीरीत्या तोडून पाणी सोडणार्‍या दळवट येथील चार जणांना अटक करण्यात आली असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन दुष्काळी परिस्थितीत गेट तोडल्यामुळे 7 ते 8 टीएमसी पाण्याची नासाडी झाली आहे. अचानक आलेल्या पाण्याने धनोली परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.