रणबीर कपूरला ईडीचे समन्स

ऑनलाइन गेमिंग ऍपप्रकरणी  बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरसह तब्बल 17 सेलिब्रिटींना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने 5 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी येण्याचे समन्स बजावले आहे. रणबीर कपूरसह अनेक सेलिब्रेटी महादेव ऑनलाइन गेमिंग ऍप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकर याच्या लग्नसोहळय़ात हजर होते. चंद्राकरवर हवालाच्या माध्यमातून कलाकारांना पैसे दिल्याचा आरोप आहे.

ईडी या प्रकरणात टायगर श्रॉफ, नुसरत भरुचा, सुखविंदर सिंह, नेहा कक्कर, सनी लियोनी, अतिफ असलम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, एली अबराम, भारती सिंह, भाग्यश्री, कृती खरबंदा, कृष्णा अभिषेक आणि सुखविंदर सिंह आदी  17 सेलिब्रिटींची चौकशी करू शकते. याबाबतचे वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. आता या यादीत रणबीर कपूरचेही नाव आले आहे.