ENG vs NZ: अंपायरच्या तीन अयोग्य निर्णयांनी हिसकावला न्यूझीलंडचा विश्वचषक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामना प्रचंड चुरशीचा झाला. दोन्ही संघ बरोबरीत आल्याने सुपरे ओव्हर घेण्यात आली. त्यातही दोन्ही संघाची बरोबरी झाल्याने दोन्ही संघातील सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंड संघाला विजयी घोषित करण्यात आले. विश्वचषकावर नाव कोरण्याचे इंग्लंडचे स्वप्न साकार झाले असले तरी पंचाच्या तीन अयोग्य निर्णयाचा फटका न्यूझीलंडला बसला. त्यामुळे त्यांचा विश्वचषक हिरावला गेल्याची चर्चा आहे.

अयोग्य अंपायरिंगमुळे न्यूझीलंडचा चषक हिसकावला गेला आहे. या सामन्यात पंच असणाऱ्या कुमार धर्मसेना आणि माराईस एरास्मस यांनी तीन अयोग्य निर्णय दिले. त्याची क्रिकेट जगतात चर्चा आहे. हेनरी निकोल्सचा अयोग्य पद्धतीने पायचित देण्याचा निर्णय धर्मसेना यांनी दिला होता. मात्र, रिव्ह्यू घेण्यात आल्यानंतर निकोल्सला नाबाद ठरवण्यात आले. रिव्ह्यूमध्ये बॉल स्टंपवरून जात असल्याचे दिसून आले. 23 व्या षटकात लियाम प्लंकेटचा चेंडू विल्यमसनच्या बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. मात्र, धर्मसेना यांना त्याला बाद दिले नाही. यावर इंग्लंडच्या संघाने रिव्ह्यू घेतला आणि निर्णय त्यांच्या बाजूने लागला. 34 व्या षटकात मार्क वूडच्या चेंडूवर अंपायर मारेयस एरास्मस यांनी रॉस टेलरला पायचित बाद ठरवले. मात्र, रिप्लेमध्ये बॉल स्टंपवरून जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. मार्टिन गप्टिलने न्यूझीलंडचा रिव्ह्यूचा आधीच वापर केल्याने टेलरला तंबूत परतावे लागले. अंपायरच्या या तीन अयोग्य निर्णयांमुळे हा सामना चर्चेत आला आहे.