
सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नोकरीसाठी ‘प्लेसमेंट’ मिळणार नाही, या भीतीने आत्महत्या केली. हाऊसिंग सोसायटीच्या आठक्या मजल्याकरून खाली उडी मारत त्याने जीवनयात्रा संपविली. ही घटना शुक्रकारी सकाळी घडली.
अक्षय अमोल माटेगाककर (21) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आठव्या मजल्यावरील राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी मारून त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच हिंजकडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाकर पोलिसांना ‘सुसाइड नोट’ मिळाली आहे. त्यामध्ये त्याने प्लेसमेंट होणार नाही, या भीतीने आत्महत्या केली असल्याचे नमूद केले आहे. त्याचे आई-वडील आणि बहीण उच्चशिक्षित आहेत. अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचा अक्षय हा चुलत भाऊ आहे.


























































