
इंग्लंडच्या जगज्जेतेपदात विदेशी शक्तीचा हात, असे कुणी म्हटले तर दचकू नका. हे सत्य आहे. मेलबर्नवर फायनल खेळलेल्या 11 खेळाडूंपैकी चक्क सहा खेळाडू हे विदेशी मूळाचे आहेत. त्यामुळे वनडे क्रिकेटचे जगज्जेतपद पटकवणाऱया इंग्लंडला टी-20 च्या जगज्जेतेपदाने क्रिकेटची महाशक्ती बनविणारी शक्ती ही विदेशीच आहे हे कुणी नाकारू शकत नाही.
काल मेलबर्नवर ऐतिहासिक कामगिरी करताना बेन स्टोक्स आणि सॅम करन हे मूळ विदेशी असलेलेच खेळाडू क्रिकेटचा बाप असलेल्या इंग्लंडच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले. एवढेच नव्हे, तर जगज्जेत्या संघात आदिल राशीद, मोईन अली, ख्रिस जॉर्डन आणि फिल सॉल्ट हे सहा खेळाडू चक्क विदेशी होते. सॅम करनने भेदक गोलंदाजी करताना पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखविली होती, तर बेन स्टोक्सने झुंजार खेळ करीत शेवटपर्यंत किलल लढविला आणि संघाच्या विजयावर आणि जगज्जेतेपदावर आपल्या संघाचे नाव कोरले. बेनने 52 धावांची अभेद्य खेळी केली. त्याचप्रमाणे पाकिस्तानी फलंदाजांना बांधून ठेवण्याची मौल्यवान कामगिरी आदिल रशीदच्या फिरकीने केली. ख्रिस जॉर्डननेसुद्धा चांगली गोलंदाजी केली. तसेच मोईन अली आणि फिल सॉल्ट यानेही छोटी का होईना, संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला.
इंग्लंडला जगज्जेता बनविणारा बेन स्टोक्स हा मूळ न्यूझीलंडचा आहे, त्याचा जन्मही ख्राइस्टचर्चचाच. तो वयाच्या बाराव्या वर्षी इंग्लंडला आला आणि इंग्लंडचाच झाला. सॅम करन हा तर झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू केव्हिन करन यांचा मुलगा. सॅमचा जन्म नार्दम्पटनशायरचा असला तरी तो मूळ झिम्बाब्वेचा आहे.
ख्रिस जॉर्डन हासुद्धा पॅरेबियन आहे. त्याचा जन्म वेस्टइंडीजच्या बार्बाडोस येथे झालाय. तसेच आदिल राशीद आणि मोईन अली हे दोघेही मूळ पाकिस्तानी असून पाकिस्तान अधिकृत कश्मीरमध्ये (पीओके) त्यांच्या कुटुंबीयांची घरे होती. मोईनचे आजोबा काश्मिरहून बार्ंमगहमला स्थलांतरित झाले तर आदिलचे वडिल 1967 साली पीओकेच्या मिरपूरमध्ये राहायचे. नंतर ते इंग्लंडच्या ब्रॅडपर्ह्ड येथे कामानिमित्त गेले आणि कायमचे ब्रिटिश झाले. इंग्लंडचा फिल सॉल्ट हा ब्रिटनचाच भाग असलेल्या वेल्सचा नागरिक आहे.


























































