पडता पडता वाचली ‘सुष्मिता सेन’, व्हिडीओ व्हायरल…

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती एका स्टोअरमधून बाहेर निघत असताना अचानक तिच्या पायाला ठेच लागून ती अडखळताना दिसत आहे.

हा व्हिडीओ आजचा असून या व्हिडीओत सुष्मिता मुंबईतील एका स्टोअरमधून बाहेर निघताना दिसत आहे. यावेळी तिने व्हाईट ड्रेससोबत हाय हिल्स घातले होते. ती या स्टोअरच्या गेटमधून बाहेर निघाली असताना तिच्या पायाला ठेस लागून ती अडखळते. मात्र ती स्वतःला सांभाळत, ‘अरे बापरे’, असे बोलताना या व्हिडीओत दिसत आहे. पायाला ठेस लागल्यानंतर ती पडते की काय असे वाटल्याने स्टोअर बाहेर तिच्या प्रतीक्षेत उभे असलेले फोटोग्राफरही किंचाळताना या व्हिडीओत ऐकू येत आहे. हा व्हिडीओ Voompla या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.


View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

10 वर्षानंतर आर्या वेब सीरिजमधून केला कमबॅक

90 च्या दशकात बॉलीवुड गाजवणारी अभिनेत्री सुष्मिता सेन हिने अनेक चित्रपटांमधून काम केली आहेत. तिने 2001 मध्ये अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत पुन्हा पदार्पण केलं होतं. आता तिने 10 वर्षानंतर पुन्हा एकदा ‘आर्या’ या वेब सीरिजमधून कमबॅक केले आहे. या वेब सीरिजमधील तिचा अभिनय तिच्या अनेक चाहत्यांना आवडला आहे.

सोशल मीडियावर असते अॅक्टिव्ह

कामासोबतच सुष्मिता सेन ही सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती पावसात नाचताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या