
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्यावर गोळी झाडणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आबे हे भाषण देत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. हा हल्ला करणाऱ्या तेत्सुया यामागामी (41 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. आबे हे अत्यवस्थ असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आबे हे लिबरल डेमोक्रॅटीक पार्टीच्या (उदारमतवादी लोकशाही पक्ष) उमेदवाराचा प्रचार करत होते. प्रचारादरम्यान ते एका रस्त्यावर उभे राहून भाषण करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. जपानमधील नारा शहरातील यामातोसाईदाजी स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.






























































