जास्त चहा प्याल तर टक्कल पडेल

कडक चहा मिळाला की आळस कुठल्या कुठे पळून जातो. पण चहाचे अतीसेवन केल्यास ताण तणाव वाढून केस विरळ होतात आणि टक्कल पडते असे समोर आले आहे. चीनच्या बीजिंग येथील विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून जे पुरुष चहाचे अती प्रमाणात सेवन करतात त्यांच्यात केस गळण्याचे प्रमाण 30 टक्के अधिक असल्याचे उघड झाले आहे.