युट्यूब बघून टाकला बोगस नोटांचा छापखाना; काशिमीरात टोळीवर झडप; दोघांना अटक

युट्यूबवरील व्हिडीओ बघून काशिमीरातील दोघांनी थेट बोगस नोटांचा छापखानाच टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला धक्कादायक प्रकार आला केला असून त्यांच्याकडून ५०० रुपये दराच्या १ लाख रुपयांच्या बनावट नोटा व नोटा छपाईसाठी उपयोगात आणला जाणारा कागद, प्रिंटर ही यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. टोळीने कुठे कुठे वठवल्या आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.

काशिमीरात बनावट नोटांचा कारखानाच एका टोळीने थाटला असून दोघे जण बनावट नोटा देण्यासाठी येणार असल्याची माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित लांडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या. सुपर्णा मन्ना व सूर्यादेब गायेन अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या २६ बनावट नोटांसह कलर झेरॉक्स प्रिंटर, ए-४ साईझचे प्लेन कागदी रिम, चाकू, स्कूल पॅड व प्लास्टिकची फुटपट्टी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.