
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार येथील शेतकरी रामकृष्ण जेंगठे (45) यांनी कर्ज व आजाराला कंटाळून ऐन दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केली. मागील काही दिवसांपासून कर्जाच्या चिंतेने व आजाराने रामकृष्ण जेंगठे हे अस्वथ होते. आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान चहा पिऊन शेतावर गेले आणि शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रामकृष्ण जेंगठे यांना दीड ऐकर शेती असून पत्नी व चार मुली आहेत.





















































