
सामना प्रतिनिधी । सावदा
शहरातील शेतमजूर लतेश प्रभाकर वाघुळदे या शेतकर्याने ऐन दिवाळीच्या दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाहीत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस रविंद्र मोरे, अमजदखान पठाण, युसूफ तडवी, विनोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची दोरी काढून त्याला खाली घेतले. मात्र आत्महत्या का केली असावी? ऐन दिवाळीच्या दिवशी याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी मृतदेह रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाठी पाठवले. व दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यावर पिंपरुड रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी असा परिवार असून. ऐन दिवाळीच्या दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात आत्महत्या केल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत होती.
























































