मुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण

723

शेतकरी कुटुंबाला गावातील काही जणांकडून तुम्ही गावात रहायचे नाही असे म्हणून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसेच मुलाने आंतरजातीय विवाह केला असल्याने संबधित लोकांकडून मानसिक त्रास दिला जात आहे. या साठी गावातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी वाकी येथील शेतकरी आसाराम सावंत हे आपल्या कुटुंब व जनावरांसह तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी सावंत यांनी म्हटले आहे की, माझ्या मुलाने अंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून गावातील काही जण मला रस्त्यावर कोठेही अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. यापूर्वी ही दोन वेळेस मला मारहाण केली आहे. तसेच तुमची जमीन आमच्या नावावर कर नाहीतर तुला जीवे ठार मारू अशा धमक्या देऊन पोलीस स्टेशनला खोटा गुन्हा दाखल करू असे सांगतात. माझ्या मुलाने आंतरजातीय विवाह केल्यापासून संबधित गावातील काही जण आमच्या कुटुंबाला त्रास देत आहेत. तुम्ही आमच्या गावात रहायचे नाही नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याने मी घाबरून गेल्या आनेक महीन्यांनपासुन गावाबाहेर रहात आहेत, त्यामुळे मला माझी शेती करता येत नाही त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

सावंत यांच्या निवेदनानुसार, या कारणास्तव शुक्रवार 6 डिसेंबर रोजी आम्ही कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर उपोषण बसलो आहोत. त्यामुळे घरी आमच्या जणावरांकडे कोण पाहणार त्यामुळे आम्ही जनांवरासह तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहोत. माझ्या कुटुंबातील आसाराम तुळशीराम सावंत, अनिता आसाराम सावंत, सुमन तुळशीराम सावंत, वैभव आसाराम सावंत, अनुराधा वैभव सावंत, अरविंद हरीभाऊ काळे, विनु अरविंद काळे, यांनी साखळी पद्धतीने अमरण उपोषण सुरू केले आहे. दिलेल्या अर्जाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी 29 डिसेंबर रोजी गावात ग्रामसभा आयोजित केली आहे. त्या ग्रामसभेत आपल्या अधिकारी व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना पाठवून ग्रामसभेतील ग्रामस्थांचे जबाब नोंदवून आमच्यावर जो अन्याय झाला, याची सतत्या पडताळून योग्य ती कारवाई करावी अशी देखील मागणी निवेदनात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या