
सामना प्रतिनिधी । देवळा
कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि दुष्काळामुळे कर्जफेड अशक्य झाल्याने देवळा तालुक्यातील कापशी येथील शेतकऱ्याने आज गळफास घेवून आत्महत्या केली.
कापशी येथील डोंगराजवळ शेतकरी गंगाराम भिला भदाणे (55) यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता झाडाला गळफास घेवून जीवन संपविले. याबाबत पोलीस पाटील भगवान जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून देवळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.
भदाणे यांची चार एकर जमीन आहे. त्यांच्यावर विकास सोसायटीचे दीड लाख रुपयांचे कर्ज असून, त्यांनी उसनवारीनेही पैसे घेतले आहे. दुष्काळी परिस्थिती, तसेच कांद्याला भाव नसल्याने ते कर्ज पेâडू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.




























































