रिलायन्सच्या भूसंपादनाला विरोध; वाडय़ातील शेतकऱ्यांना बेदम मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वाडा

नागोठणे ते दहेज इथेन वाहून नेणाऱ्या पाइपलाइनसाठी रिलायन्सने ठिकठिकाणी शेतकऱ्यांवर दडपशाही सुरू केली आहे. अनेकांना मोबदला न देताच सुपीक जमिनींवर बुलडोझर फिरवून या लाइनसाठी खोदकाम केले जात आहे. मात्र या दंडेलशाहीविरोधात आवाज उठवणाऱ्या वाडय़ातील शेतकऱयांना आज पोलिसांनी अमानुष मारहाण करून त्यांना अक्षरशः फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये डांबले. खाकी वर्दीच्या या जुलमी अन्यायाविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न
बाधित शेतकरी हक्क मागत असताना पोलिसांकडून त्यांचा आवाज दाबण्याचे काम पोलिसांकरवी कंपनी करीत असल्याचा आरोप मनीषा गायकवाड यांनी केला. या मारहाण प्रकरणाची व्हिडीओ क्लिप असून पोलिसांचे पितळ उघडे होईल, असे त्या म्हणाल्या.

गुजरातमधील दहेज येथून रायगड जिह्यातील नागोठण्यापर्यंत ही इथेन वायू नेणारी रिलायन्सची पाइपलाइन टाकण्यात येत असून तिचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या वाडा तालुक्यात पाइपलाइन टाकण्यात येत आहे, मात्र रिलायन्सने शेतकऱ्यांवर अन्याय करत काही ठिकाणी मोबदला न देताच खोदकाम सुरू केले आहे. बिलोशी येथील शेतकरी मनोज गायककाड यांच्या शेतातूनही पाइपलाइन गेली असून त्यांना कंपनीने नुकसानभरपाई दिलेली नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

शनिकारी संध्याकाळी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना मनोज गायककाड क त्यांच्या कुटुंबीयांनी शेतावर धाव घेत काम बंद पाडले. त्यानंतर कंपनीने पोलिसांना पाचारण केले. पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी दंगल नियंत्रण पथक क अन्य पोलिसांच्या फौजफाटय़ासह तत्काळ बिलोशीत धाव घेत शेतकऱ्यांना समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यावर गायकवाड यांनी पोलीस उपअधीक्षकांना आम्हाला भरपाई दिलेली नाही म्हणून आम्ही काम बंद केल्याचे सांगितले. त्याच वेळी योगेश चव्हाण यांनी मनोज यांच्या कानशिलात मारल्याने काद आणखी चिघळला. यावेळी पोलिसांनी अन्य शेतकऱ्यांनाही मारहाण करून अटक केली. यात महिलांचा मोठा सहभाग आहे.