
सामना ऑनलाईन,खंडाळा
कांद्याचे भाव गडगडल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा उकिरड्यावर फेवूâन दिला. कांद्याचे भाव गडगडले असून, एकशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल खरेदी होत आहे. कांदा विक्रीस काढल्यावर किमान रोपलागवड व मेहनतीचा खर्च निघेल या आशेने शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. आज ना उद्या भाव वाढतील या उद्देशाने चाळी भरून ठेवल्या. परंतु रोजच कांद्याचे भाव गडगडत असल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा उकिरड्यावर फेवूâन दिला.
कांदा चाळीतून भरून मार्केटपर्यंत नेण्यासाठी एका क्विंटलला एकशे चाळीस रुपये खर्च येतो. मेहनत, खत, लागवड, रोप, पाणी भरणे हा खर्चही लावला तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे आजही शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कांदा चाळीत पडून आहे. दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी चाळ उभी केली. मात्र कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.


























































