फॅशन विश्व लहान मुलांचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पूजा सामंत

फॅशनचा विचार करताना सर्वसाधारणपणे युवा पिढीचा विचार केला जातोय, पण लहान मुलांचे फॅशन विश्व 360 डिग्री बदलले आहे. बहुतेक लहान मुले ट्रेंडी ड्रेसमध्ये दिसून येतात. तेच तेच टिपिकल ड्रेस लहान मुलांनी वापरण्याचे दिवस गेले.

बच्चे पंपनीच्या फॅशन विश्वात मोठे बदल झाले आहेत. खूप स्टायलिश ट्रेंड आले आहेत. लहान मुलांना स्वतःला फॅशन सेन्स येऊ लागला आहे. कुठल्याही मार्पेट्समध्ये पहा, किड्सवेअरमध्ये खूप आकर्षक ड्रेसेस दिसून येतात. आता बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याला जीन्स पँट्स, कलरफुल टी शर्टस्, विविध जर्सीज यांची रेलचेल दिसते. लहान मुलींचे ड्रेस-फ्रॉक यात खूप विविधता आढळून येते.

काही फॅशन ब्रँड्समध्ये लहान मुलांच्या बदलत्या फॅशन ट्रेंड्सचा विचार करत ड्रेस डिझाइन होतात. एखाद्या लहान बालिकेला निळा रंग आवडत असल्यास तिच्या आवडीचा विचार करून अनेक ट्रेंडी आऊटफिट्स बनवले जात आहेत. त्यात सणा-वारांचा विचार करून पारंपरिक ड्रेस डिझाइन केले जातात. फॅमिली गॅदरिंग, रक्षाबंधन- दिवाळी सणाला गडद शेड्स, फॅन्सी डिझाइन, लहान मुलींना आवडणारे घेर असलेले गाऊन किंवा अगदी खणांचे ट्रेंडी परकर, पोलके डिझाइन केले जातात. ज्यांना शक्य आहे ते पालक मुलांचे ‘कस्टमाइज्ड ड्रेस’ करून घेतात. लहान मुलांच्या अटायरमध्येदेखील थ्री पीस सुट्सचे वाढते प्रमाण आहे. धोती-कुर्तादेखील दिसून येतो. धोती-कुर्ता आणि त्यावर परफेक्ट फिटिंग आणि साइड कट्सचे जॅकेट घालून मुले आकर्षक व स्मार्ट दिसतात.

ड्रेस कोड
लहान मुलांच्या वाढदिवशी अलीकडे ड्रेस कोड ठेवलेला असतो. त्या ड्रेस कोडनुसार स्टायलिंग आणि ड्रेस डिझायनिंग करण्याचा ट्रेंड नव्याने सुरू झालेला दिसतो. लहान बालके जीन्स, जॅकेट, कधी फॅन्सी हॅट, टी शर्ट किंवा शर्टस् अशा ड्रेसमध्ये दिसून येतात, तर बालिका पिंक, बर्गंडी, रेड, ब्ल्यू, व्हाइट अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये बर्थ डे पार्टीज ऐटीत अटेंड करताना दिसतात.

– फेयॉन किड्स या फॅशन ब्रँडचे इन हाऊस डिझायनर सांगतात, खूपशी लहान मुले अशी आढळून येतात त्यांना एकच -एकच प्रकारचे ड्रेस किंवा एकाच कलरचे ड्रेस घालणे आवडते. अशा लहान मुलांसाठीदेखील स्टायलिस्ट डिझायनर विविधता निर्माण करून देतात.

– काळ बदलत चालला आहे. लहान मुलेदेखील आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करताना फॅशन शोमध्ये दिसून येतात. मुलांना आत्मविश्वास मिळवून देण्यात त्यांच्या आवडीच्या ड्रेसची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.

– मॉम अॅण्ड बेबी अशी मॅचिंग रंगसंगती हा आणखी एक ट्रेंड हल्ली जोरात आहे. पण लहान मुलांना वेस्टर्न ड्रेसची भुरळ पडलीये हे मात्र खरे. केजुअल ते वेस्टर्न आणि

ट्रडिशनल ते कस्टमाइज्ड असे पर्याय आहेत. लहान मुलांचे फॅशन विश्व विस्तारत आहे.