सासरा सुनेच्या प्रेमात पागल! पळून जाऊन केला विवाह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ते कोणताही सामाजिक, आर्थिक, धार्मिक भेद जुमानत नाही. असंच एक प्रेम प्रकरण उत्तर प्रदेशच्या बदायूं येथे घडल्याचं उघड झालं आहे.

या प्रकरणात मात्र हे नातं सासरा आणि सून असं आहे. बदायूं येथील या माणसाचं नाव देवानंद असं असून त्याचं वय 45 वर्षं इतकं आहे. त्याच्या अल्पवयीन मुलाचं लग्न 2016मध्ये झालं होतं. देवानंद याच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे वर्षाच्या आत हा विवाह उरकण्यात आला.

लग्नानंतर सहाच महिन्यात या नवीन दांपत्याचं पटेनासं झालं. त्या दरम्यान देवानंद आणि त्याची सून यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी तिथून पळून जायचा निर्णय घेतला.

पळून जाऊन दोघांनीही लग्न केलं. काही काळाने ते दोघंही दोन वर्षांच्या त्यांच्या मुलाला घेऊन परतले. तेव्हा त्यांच्या घरात एकच गहजब उडाला. पंचायतीसमोर त्याची शहानिशा करण्यात आली.

तेव्हा पंचायतीने देवानंदच्या बाजूने कौल दिला. लग्नावेळी वर वधू दोघेही अल्पवयीन होते. आता सज्ञान झाल्यानंतर जर या तरुणीला देवानंदसोबत विवाह बंधनात राहायचं असेल, तर त्याला काहीही हरकत नसल्याचं पंचायतीने जाहीर केलं आहे.