Video – चंद्रपुरात मल्टीस्पेशलिटी रुग्णालयावर धाड, औषध साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहरातील एका बड्या मल्टीस्पेशलिटी रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली आहे. लाखो रुपयांचा विनापरवाना साठविलेला औषध साठा जप्त केल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना काळात जीवनावश्यक औषधांचा साठा नियंत्रित राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विविध रुग्णालयांची अचानक तपासणी केली जात आहे.  अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने डॉ. प्रकाश मानवटकर यांच्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये धाड घातली.

पथकाने रुग्णालयाची कसून तपासणी केल्यावर रुग्णालयाच्या तळघरात साठवून ठेवलेला हा औषधसाठा आढळून आला. या औषधात चार हजार अल्ट्राझोलम या झोपेच्या गोळ्यांचा समावेश आहे.  या तपासात विटामिन गोळ्यांसह अन्य मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या औषधांचा साठा आढळला.  म्हणून अन्न व औषध प्रशासनाने मानवटकर रूग्णालयाविरोधात मोठ्या कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाची संबंधित विविध कलमान्वये ही कारवाई केली जात आहे.  कोरोना काळात अशा पद्धतीने बेकायदेशीर साठा साठवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.