सोहम रेसिडेन्सी इमारतीतील नागरीकांनीच उभारला ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी शहरातील सोहम गार्डन रेसिडेन्सी या इमारतीतील रहिवाशांनी इमारतीच्या आवारातच कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरु केला आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहूल पंडीत हे या इमारतीमध्ये राहतात. त्यांनी स्वतः शहरातील अन्य नागरीकांपुढे आदर्श ठेवताना स्वतःच्याच इमारतीमध्ये खतनिर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला. 3 महिन्यांच्या प्रयत्नानंतर अर्धा टन खत तयार झाले आहे.