120 दिवसांत 3 लाख मेट्रिक टन कचऱ्यापासून खतनिर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कित्येक वर्षांपासूनचा मिरज-बेडग रत्यावरील वड्डी येथील कचऱयाचा प्रश्न सांगली महापालिकेने अखेर संपुष्टात आणला आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत भूमी ग्रीन या कंपनीकडून 120 दिवसांत 3 लाख 13 मेट्रिक टन कचऱयावर प्रक्रिया करीत त्यातून खतनिर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे कचऱयाची समस्या कायमची निकाली निघाली आहे. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी ही माहिती दिली.

सांगली महापालिकेची प्रशासकीय सभा आयुक्त सुनील पवार यांनी बेडग (वड्डी) कचरा डेपोमध्ये घेतली. या सभेस अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, वैभव साबळे, नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त पवार म्हणाले, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कचरा हा बेडग रोड आणि समडोळी रोड डेपोमध्ये टाकला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तीनही शहरांतील कचरा हा या दोन डेपोंमध्ये टाकला जातो. यापूर्वी कचऱयाची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा महापालिका प्रशासनाकडे नव्हती. त्यामुळे दोन्ही डेपोमध्ये मिळून साडेनऊ लाख मेट्रिक टन इतका कचरा पडून होता. या कचऱयाची शास्त्र्ााsक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने घनकचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेत पुण्यातील कंपनीला कंत्राट दिले. हे कंत्राट दिल्यापासून संबंधित कंपनीकडून गेल्या 120 दिवसांत बेडग रोड आणि समडोळी कचरा डेपोमध्ये पडून असणाऱया 3 लाख 13 मेट्रिक टन कचऱयाची विल्हेवाट लावून त्यापासून खतनिर्मिती करण्यात आली आहे.